वनराणी
काही काही गोष्टी , कथा अशा असतात की त्यातल्या व्यक्तिरेखा मनावर एखाद्या गोंदणा सारख्या लोर्ल्या जातात. मन त्या व्यक्तिरेखेचा चेहरा एक परिमाण म्हणून मानू लागतो. कधी कधी हे रेखाटन इतकं गडद होतं की दुसऱ्या कुठल्याही कथेत वा प्रसंगात फक्त तेच रेखाटन मनाला बघायचं असतं. तसाच काहीसं माझ्याही मनाचं झालंय .. माझ्या मनावर कैक वर्षांपूर्वी कोरलं गेलेलं रेखाटन म्हणजे जीत रे जीत मधली ती 'वनराणी'

हा चांदवा टपोर भारी
अशा वाटा माळरानी
नदीचे पैंजण पायी
आली कुठून ही वनराणी !
बाभळीचे तुडवी काटे
अंगात झऱ्याची ओढ
पायात नभाचे तोडे
नजरेत कपारी वेध
ती आली झरझर खाली
झाडून काळोखी जाळी
सोडून घराची चौकट
तोडून शपथ ती काळी
इथे अल्याड डोंगरमाथा
अन पल्याड सागरभरती
वादळाला उभी धरून
एकटी ती खडकांवरती
गेली वाहून जी कधीची
आता ना परतायाची
काजळाचा करून चंद्र
ओलांडली वेस गावाची !
अशा वाटा माळरानी
नदीचे पैंजण पायी
आली कुठून ही वनराणी !
बाभळीचे तुडवी काटे
अंगात झऱ्याची ओढ
पायात नभाचे तोडे
नजरेत कपारी वेध
ती आली झरझर खाली
झाडून काळोखी जाळी
सोडून घराची चौकट
तोडून शपथ ती काळी
इथे अल्याड डोंगरमाथा
अन पल्याड सागरभरती
वादळाला उभी धरून
एकटी ती खडकांवरती
गेली वाहून जी कधीची
आता ना परतायाची
काजळाचा करून चंद्र
ओलांडली वेस गावाची !
कुठे..
नकळत घडते पाप आणिक
बाळ पोरका होतो कुठे ..!
कवचकुंडले ज्यास मिळाली
द्रौपदीसाठी रडतो कुठे ..?
गळून गेले सत्य मोती तर
असत्य धागा गळतो कुठे ..!
अनेक जाहले पार्थ तरीही
तसा सारथी मिळतो कुठे ..?
हा अनंत नभाचा गाभा
क्षितिजावर कलतो कुठे ..?
स्वप्नराखेवर हा प्रवासी
अनवाणी आता फिरतो कुठे ..?
फुंकर कोण्या अमृताची अन
सूर वेणूचा विरतो कुठे ..?
शब्दाक्षरांचे विणतो जाळे
अर्थच हाती उरतो कुठे ..!
बाळ पोरका होतो कुठे ..!
कवचकुंडले ज्यास मिळाली
द्रौपदीसाठी रडतो कुठे ..?
गळून गेले सत्य मोती तर
असत्य धागा गळतो कुठे ..!
अनेक जाहले पार्थ तरीही
तसा सारथी मिळतो कुठे ..?
हा अनंत नभाचा गाभा
क्षितिजावर कलतो कुठे ..?
स्वप्नराखेवर हा प्रवासी
अनवाणी आता फिरतो कुठे ..?
फुंकर कोण्या अमृताची अन
सूर वेणूचा विरतो कुठे ..?
शब्दाक्षरांचे विणतो जाळे
अर्थच हाती उरतो कुठे ..!